Laxman hake : मनोज जरांगे पाटील वाळू माफियांची कार वापरतात; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Laxman hake on Manoj Jarange Patil : लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. मनोज जरांगे पाटील वाळू माफियांची कार वापरत असल्याचाही गंभीर आरोप हाकेंनी केला.
Laxman Hake and Manoj Jarange
Laxman Hake Criticized Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके याच्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Laxman Hake and Manoj Jarange
Manoj Jarange Patil: 'फडणवीस साहेब तुमची नियत चांगली नाही', डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील कडाडले; आंदोलनाचा दिला इशारा

लक्ष्मण हाके यांनी पुण्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. लक्ष्मण हाके म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील जी कार वापरतात, ती वाळू माफीयांची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वाळू माफीयांचा पाठिंबा आहे. बीडमधील वाळू माफियांचा आका कोण आहे, त्याचा शोध पहिला घेतला पाहिजे. ज्या लोकांवर तडीपारीचा कारवाई झाली, त्यांनीच माझ्यावर पुण्यात हल्ला केला आहे'.

Laxman Hake and Manoj Jarange
Politcal News : बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजप खासदाराचा घणाघात

सुरेश धस यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना हाके म्हणाले, 'सुरेश धस यांचा खरा जातीवादी चेहरा समोर आला आहे. सुरेश धस यांच्या डोक्यावर इलाज करण्याची गरज आहे'.

पंकजा मुंडे यांनी ओबीसी पक्षाबाबत वक्तव्य केलं. यावर हाके म्हणाले, 'पंकजा मुंडे यांनी काय करावं, काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. ओबीसींची विचारधारा मानणारा पक्ष निर्माण होणे काळाची गरज आहे'.

Laxman Hake and Manoj Jarange
Laxman Hake : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून पळ का काढला? लक्ष्मण हाकेंचा सवाल

राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावरही हाके यांनी भाष्य केलं. 'राहुल सोलापूरकर यांनी अशी वक्तव्ये टाळावीत. महापुरुषांवर बोलण्याची पात्रता आहे का? राहुल सोलापूरकर यांना शॉक ट्रीटमेंट किंवा वेड्याचा इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे, असेही हाके पुढे म्हणाले. लक्ष्मण हाके यांनी टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com