Eknath Shinde- Devendra Fadnavis
Eknath Shinde- Devendra FadnavisSaam TV

Politcal News : बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजप खासदाराचा घणाघात

Anil Bonde on Shivsena Advertise : शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागला आहे, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला.
Published on

Mumbai News : शिवसेनेच्या 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीचे पडसाद उमटू लागले आहे. कालपर्यंत मवाळ घेतलेले भाजप नेते आता आक्रमक होताना दिसत आहे. काल जाहिराती नवी जाहिरात देत भाजपची नाराजी दूर करण्याच प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला, पण देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे  लोकप्रिय मुख्यमंत्री दाखवल्याची कृती भाजप नेत्यांना पटलेली दिसत नाही.

शिवसेनेच्या जाहिरात प्रकरणावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी घणाघात केला आहे. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही, असं उदाहरण देत बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून निशाणा साधला.

शिंदेंना ठाणे महाराष्ट्र वाटू लागलाय

एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना चुकीचे सल्ले देत आहेत. शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागला आहे, असा टोलाही अनिल बोंडे यांनी लगावला. (Maharashtra Political News)

Eknath Shinde- Devendra Fadnavis
Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ५५ रुपयात पेट्रोल वाटप, नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी

देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजासाठी काम करतात. ते भाजपमधील मोठे नेते आहेत. त्याचं नाव खेड्यापाड्यासह इतर ठिकाणी निघत असते. हा सर्व्हे नेमका केला कुणी तो ठाण्यापुरत मर्यादित होता की महाराष्ट्रचा होता, असा सवालही बोंडे यांनी उपस्थित केला. पुढच्या काळात शिवसेनेला वाटचाल करायची असेल तर भाजप व जनतेचं मन दुखवून चालणार नाही, असंही बोंडे म्हणाले. (Latest Marathi News)

Eknath Shinde- Devendra Fadnavis
Maharashtra Politics: वादानंतर आता भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात; दिग्गज नेत्यांसह फडणवीसांचाही फोटो झळकला

कालच्या वादानंतर नवी जाहिरात

कालच्या जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर आज भाजप-शिवसेना युतीची नवी जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

याशिवास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटोही जाहिरातीत झळकला आहे. जनतेचा कौल शिवसेना-भाजप युतीलाच असा दावा सुद्धा जाहिरातून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com