Suresh Dhas : 'मोठ्या मनानं पोलिसांना माफ करा'; सोमनाथच्या मृत्यूबाबत सुरेश धसांची दुटप्पी भूमिका, VIDEO

Suresh Dhas on Somnath suryavanshi : संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पायाला भिंगरी लावून फिरणारे आणि पोलिसांसह आरोपींवर कारवाईची मागणी करणारे भाजप आमदार सुरेश धस यांना सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी मात्र पोलिसांचा पुळका आलाय. नेमकं काय म्हटले सुरेश धस? त्यांनी वादग्रस्त पोलिसांबाबत भूमिका का बदलली? यावरचा विशेष रिपोर्ट....
 BJP Mla Suresh Dhas  news
BJP Mla Suresh DhasSaam Tv
Published On

सरपंच हत्त्येप्रकरणी आका आका म्हणत राज्यभर आरोपींना फाशी देण्य़ाची मागणी करणाऱे भाजप आमदार सुरेश धस यांचा दुटप्पीपणा समोर आलाय. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा असं आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय. परभणीतील आंबेडकर अनुयायी सोमनाथ सुर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला.

 BJP Mla Suresh Dhas  news
Walmik Karad : "मी बीड जिल्ह्याचा बाप..." वाल्मीक कराड आणि पोलिसांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत आंबेडकरी संघटनांनी मुंबईला धडक देण्यासाठी लाँग मार्च काढला. मात्र नाशिकमध्ये सुरेश धस यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आणि मोर्चाचा नाशिकमध्येच समारोप झाला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पोलिसांची कानउघडणी झालीय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं योग्य होणार नाही असं अजब विधान त्यांनी केलंय.

 BJP Mla Suresh Dhas  news
walmik karad audio clip : 'बीडचा बाप मीच'; कराडची महिला PSIसोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल, VIDEO

सोमनाथच्या मारेकऱ्यांना माफी का?

'पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा, असं सुरेश धस यांनी म्हटलं. धस यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी समाचार घेतलाय. वाल्मिक कराडला एक न्याय आणि परभणी पोलिसांना वेगळा न्याय का? धस जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. तर सोमनाथच्या आईनंही धसांबाबत नापसंती व्यक्क करत पोलिसांना माफ करायचं असल्यास सोमनाथला परत द्या अशी अद्वीग्न मागणी केली. 'माफी द्यायची असल्यास माझ्या मुलाला परत द्या', असं सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने म्हटलं आहे.

 BJP Mla Suresh Dhas  news
Walmik Karad : 'आकाची नार्को टेस्ट करा', सुरेश धस यांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार?

'जातीचं राजकारण कशासाठी? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजनामा मागितलाय. एवढंच नव्हे तर अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला फासावर लटकवण्याची मागणी केली. गॅग्स ऑफ परळी म्हणत परळीच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले . आणि केवळ १५० किलोमीटर दूर असलेल्या परभणी पोलिसांचा मात्र सुरेश धस यांना इतका पुळका का बरं आला? असा संतप्त प्रश्न धस यांना विचारला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com