एका मोटारसायकलचा शोध घेताना पोलिसांच्या हाती लागला गब्बर!

चोरीच्या १९ मोटारसायकलसह आरोपीला अटक
एका मोटारसायकलचा शोध घेताना पोलिसांच्या हाताला लागला गब्बर!
एका मोटारसायकलचा शोध घेताना पोलिसांच्या हाताला लागला गब्बर!SaamTvNews
Published On: 

लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या ईतर जिल्ह्यातही मोटारसायकली चोरून विकणाऱ्या मोटारसायकल चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत अखिल मेहबूब शेख असं या चोरट्याचं (Thief) नाव असून तो मूळचा परळीचा राहिवासी (Parli) आहे. लातूर (Latur) जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या ईतर जिल्ह्यात देखील या आरोपीने मोटारसायकली चोरल्या असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय.

हे देखील पहा :

आत्तापर्यंत या आरोपीकडून १९ मोटारसायकली (Bikes) पोलिसांनी हस्तगत केल्या असून तपासात आणखी मोटारसायकली मिळणार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. दरम्यान काही दिवसांपूर्वी लातूर शहरातल्या विवेकानंद पोलिसात मोटारसायकल चोरीचा (Bike Theft) गुन्हा नोंद होता. त्या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना अनेक दुचाकींची चोरी करणारा गब्बर हाती लागलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.