Ahmedpur Vidhan Sabha : अहमदपूरमध्ये महायुतीत बिघाडी; माजी आमदार खंदाडे अपक्ष उतरणार रिंगणात

Latur News : लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.
Ahmedpur Vidhan Sabha
Ahmedpur Vidhan SabhaSaam tv
Published On

संदीप भोसले 

लातूर : अहमदपूर मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदपूरचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असून ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर बब्रुवान खंदारे विजयी झाले होते. दरम्यान सध्या महायुतीत (Mahayuti) ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे असून राष्ट्रवादीने येथून विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळेच माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Ahmedpur Vidhan Sabha
Onion Price : रस्त्यावर कांदा फेकत शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकरी आक्रमक

अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बब्रुवान खंदाडे हे महायुतीकडून इच्छुक आहेत. मात्र इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतली आहे. तर आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणा उतरणार असा निर्णय घेतला असल्याची माहिती स्वतः माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com