Latur Food Poisoning : खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ

Latur Breaking News : पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी समोरच असलेल्या मातोश्री वसतिगृहात राहतात.
खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ
Latur Food PoisoningSaam TV
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात 30 ते 35 विद्यार्थिनीला विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या जेवणातून विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची प्राथामिक माहिती आहे. या विद्यार्थिनींना तात्काळ उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.

खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ
Akola News : संतापजनक! निर्दयी बापाने 2 चिमुकल्या मुलींना नदीत फेकलं; मन सुन्न करणारी घटना, आरोपीला अटक

लातूर शहरातल्या औसा रोड भागातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहेत. जवळपास 300 पेक्षा जास्त विद्यार्थिनी निवासी वसतिगृहात राहतात. संस्थेकडूनच विद्यार्थिनींच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. शनिवारी रात्री विद्यार्थिनींनी नियमित जेवण केले.

मात्र, जेवणानंतर त्यांना अचानक चक्कर, मळमळ, उलटी यासारखा त्रास जाणवू लागला. बघता-बघता ३० ते ३५ विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. त्यामुळे वस्तीग्रह प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना तात्काळ उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीला या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती व्यवस्थित स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांनी दिली. या संपूर्ण प्रकारामुळे पालकवर्गांमधून संताप व्यक्त केला जात असून वसतिगृहाच्या जेवणावर प्रश्नचिन्ह उभं करण्यात येतंय.

जिंतूरमध्ये भगर खाल्ल्याने विषबाधा

जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावातील जवळपास 35 जणांना भगर पिठाची भाकर खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्व बाधितांना सरकारी आणि खाजगी रुगणालयात भरती करण्यात आले. नवरात्र निमित घटस्थापनेचा उपवास असल्याने पुंगळा गावातील नागरिकांनी गावातील किराणा दुकानातून भगर पीठ खरेदी केले होते.

रात्री उपवास असल्याने रात्री भगर पिठाची भाकर खाण्यात आली आणि काही तासांतच उलटी मळमळ आणि चक्कर येऊन अंगाचा थरकाप सुरू झाल्याने जिंतूर येथील ट्रामा केअर आणि काही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार करून सगळ्यांना घरी पाठवण्यात आले असून सर्वांची प्रकृती ठीक आहे.

खळबळजनक! लातूरमध्ये 30 ते 35 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा; प्रशासनाची धावपळ
Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने अख्ख्या गावाला विषबाधा; तब्बल 300 नागरिक रुग्णालयात दाखल, नांदेडमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com