latur lok sabha : लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का; काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगेंनी ७० हजार मतांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली

latur lok sabha constituency Result : लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे विजयी झाले आहेत. काळगे यांनी भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला आहे.
 भाजपला मोठा धक्का; काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगेंनी ७० हजार मतांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली
latur lok sabhaSaam tv

लातूर : लातूरमध्ये लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा दारुण पराभव केला आहे. काळगे यांनी मोठ्या मताधिक्याने भाजप उमेदवार सुधाकर शृंगारेंचा पराभव केला आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात मोठा फेरबदल झाला आहे. लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजच्या सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये अतितढीची लढत होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लातूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराा दारुण पराभव केला.

 भाजपला मोठा धक्का; काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगेंनी ७० हजार मतांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली
Kolhapur Lok Sabha Election Result : कोल्हापुरात यावेळी छत्रपतींच्या गादीचा करिष्मा; शाहू महाराजांनी दिली संजय मंडलिकांना शिकस्त

लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. लिंगायत समाजाचा विचार करून काँग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात ट्विस्ट आला होता. मात्र, या मतदारसंघात काँग्रेसने जोरदार मुंसडी मारत भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंचा पराभव केला.

 भाजपला मोठा धक्का; काँग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगेंनी ७० हजार मतांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली
Sharad Pawar Full Pc | लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं वैशिष्ट्य काय? शरद पवारांनी सांगितलं..

दरम्यान, यंदा लातूर लोकसभा मतदारसंघात ६१.४१ टक्के मतदान झालं. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर केंद्रावर प्राथमिक उपाचाराची सुविधा ठेवण्यात आली होती. या मतदारसंघात १९ लाख ७७ हजार इतकी मतदार संख्या आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूर, लातूर शहर, लातूर ग्रामीण, लोहा कंधार, निलंगा आणि उदगीर विधानसभेता समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com