लातूर जिल्हा बँकेवर देशमुखांची सत्ता, सहकार पॅनलचा दणदणीत विजय, विजेत्या उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Latur District Bank Election : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख आणि बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचा विजय झाला आहे. परिवर्तन पॅनलला किती जागा मिळाल्या? कोणत्या दिग्गजांनी बाजी मारली? वाचा सविस्तर निकाल.
Latur District Central Cooperative Bank election result
Latur District Central Cooperative Bank election result
Published On: 

संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी

Latur District Central Cooperative Bank election result : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने जोरदार विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुख आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने बँकेची सत्ता आपल्या हातात घेतली आहे. या विजयानंतर धीरज देशमुख यांनी सिटी वाजवत कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष केला.

निवडणुकीची चुरस आणि निकाल:

या निवडणुकीत सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये मोठी टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीच्या १५ पैकी १२ जागांचे निकाल हाती आले होते, ज्यामध्ये सहकार पॅनलचे ७ तर परिवर्तन पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले होते. शेवटी सहकार पॅनलने बहुमत मिळवत बँक आपल्या ताब्यात घेतली.

Latur District Central Cooperative Bank election result
भाजप राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधीच होऊ देणार नाही, बड्या नेत्याचा दावा; सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंचा दिला संदर्भ

या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रक्रिये उद्योग मतदारसंघातून धीरज देशमुख यांनी १५ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला, तर त्यांच्या विरोधातील परिवर्तन पॅनलचे भरत चामले यांना केवळ २ मते मिळाली. याशिवाय उदगीर सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनलच्या प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी १० मतांनी विजय मिळवला, तर मत्स्य आणि हाउसिंग मतदारसंघातून जयेश विश्वंभर माने विजयी झाले. दुसरीकडे, निलंगा विकास संस्थेतून भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू तथा परिवर्तन पॅनलचे प्रमुख अरविंद पाटील निलंगेकर हे देखील विजयी झाले आहेत.

या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते, अखेर सहकार पॅनलने बाजी मारत जिल्हा बँकेवर आपला झेंडा फडकवला आहे.

Latur District Central Cooperative Bank election result
El Niño : 'एल निनो'ने महाराष्ट्राची चिंता वाढवली, पावसानंतर आता हिवाळ्यावर परिणाम होणार, तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.