Latur News
Latur NewsSaam Tv

Latur Crime: बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक प्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

लातूर - बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विकास बालाजी पारसेवार यांनी एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

हरंगुळ बु. ता. जि. लातूर येथील गट क्रमांक 111/1 मधील जमिनीच्या खरेदी व्यवहारापोटी 4 जानेवारी 2009 रोजी 12 लाख रुपये आणि 18 ऑगस्ट 2009 रोजी 13 लाख रुपये स्विकारल्याची रशीद पावती तयार करून त्यावर फिर्यादीची खोटी स्वाक्षरी करून 27 ऑगस्ट 2009 रोजीचा 100 रुपयांचा बॉन्ड पेपरवरही बनावट खरेदी व्यवहाराच्या ठरावाचा मजकूर नमूद करून त्यावरही खोट्या स्वाक्षरी करण्यात आलेल्या होत्या.

Latur News
Thane: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक; मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले होते आदेश

बनावट कागदपत्र तयार करून काझी शोएब अफरोज मोईनोद्दीन, रिझवान अब्दुल रज्जाक शेख, पंढरी अरुण कदम, संतोष प्रभाकर पवार, म. यासिन शरीफ, शोभा रामेश्वर सूर्यवंशी, महादू विठ्ठल गायकवाड, शेख इम्रान ईस्माईल यांनी फसवणूक केल्याची तक्रार दिल्यावरुन त्यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com