Latur News : शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात अचानक दुखू लागलं, रुग्णालयात पुन्हा तपासणी केल्यानंतर डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड

latur News in Marathi : लातूरच्या औसा ग्रामीण रुग्णालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शस्त्रक्रियानंतर महिलेच्या पोटात अचानक दुखू लागलं, त्यानंतर तपासणीनंतर तिच्या पोटात कपडा आढळला.
latur news
HospitalSaam tv
Published On

संदिप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी

लातूर : लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या औसा ग्रामीण रुग्णालयात प्रसृतीवेळी शस्रक्रिया करताना महिलेच्या पोटात रक्त पुसण्यासाठी वापरण्यात येणारा कापड पोटात ठेवून टाके घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने लातूरच्या औसा परिसरात खळबळ उडाली आहे.

लातूरच्या औसा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी हा प्रकार केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी हा आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण घटनेनंतर महिला बचावली आहे.

latur news
Latur Politics : लातूरमध्ये राजकीय वातावरण तापलं; अमित देशमुखांच्या विधानाने मविआत वादाचे संकेत

नेमकं काय घडलं?

लातूरच्या ग्रामीण रुग्णालयात एका महिलेची प्रसृतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रसृतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेला पोटदुखी सुरु झाली. त्यानंतर उमरगा येथील खासगी रुग्णालयात संबंधित महिलेला पोटदुखी सुरु झाल्याने पाठवण्यात आलं होतं. या खासगी रुग्णालयात महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करुन पोटातून कॉटनचा नॅपकिन काढावा लागला. तर या संपूर्ण घटनेत महिलेचा जीव सुदैवाने वाचला आहे. मात्र, रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

latur news
Latur Crime : धक्कादायक! मध्यरात्री दबक्या पावलाने घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून ३४ वर्षीय महिलेवर केला अत्याचार

व्यक्तीच्या पोटात निघाले ६००० खडे

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात एका वृद्धाच्या पोटात ६००० खडे निघाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोटदुखीने त्रस्त असलेला व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. वृद्धाच्या पोटातील खडे मोजून मोजून रुग्णालयातील कर्मचारी थकले. तर या वृद्धाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनाही घाम फुटला.

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील तलवंडी परिसरातील ही घटना आहे. या खड्यांचा आकार हा मोहरीच्या दाण्यापासून हरभऱ्याएवढा होता. पोटातील खड्यांची मोजणी करतना अडिच तासांहून अधिकचा वेळ लागला. या व्यक्तीला अनेक दिवसांपासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. तर या व्यक्तीच्या पित्ताशय मूळ आकाराचा दीडपट वाढल्याचे दिसून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com