Accident News : लातूरमध्ये भीषण अपघात, आयशर टेम्पोला बीएमडब्ल्यूची धडक, ४ जणांचा मृत्यू

Latur Ausa Accident News : लातूरच्या औसा-तुळजापूर महामार्गावर भरधाव कारने ट्रक आणि कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident News : लातूरमध्ये भीषण अपघात, आयशर टेम्पोला बीएमडब्ल्यूची धडक, ४ जणांचा मृत्यू
Latur Ausa Tuljapur Expressway Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • लातूरच्या औसा-तुळजापूर महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात

  • भरधाव कारने ट्रक आणि कंटेनरला पाठीमागून धडक दिली

  • या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू

  • दोन जण गंभीर जखमी

Latur Ausa Tuljapur Expressway BMW Car Accident 4 Killed लातूरमध्ये औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. भरधाव बीएमडब्ल्यू कारने ट्रक आणि कंटेनरला जोराची धडक दिली. या कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात इतका भयानक होता की, कारचा चेंदामेंदा होऊन महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली.

अपघातग्रस्त झालेली कार सांगली येथील असून यातील तरुण काही कामानिमित्त लातूरला आले होते. काम आटोपल्यानंतर तरुणांनी शिवली येथे जेवण केले आणि त्यानंतर कारमधील एका मित्राला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती. दरम्यान, औशानजीक एका हॉटेल समोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला आणि एका कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

Accident News : लातूरमध्ये भीषण अपघात, आयशर टेम्पोला बीएमडब्ल्यूची धडक, ४ जणांचा मृत्यू
Shcoking : धक्कादायक! १६ वर्षीय मुलीकडून बाळाला जन्म; अर्भक कचऱ्याच्या डब्यात टाकून काढला पळ

धडक एवढी भीषण होती की, लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. अपघातात मृत झालेल्यांची नावे धनराज काशिनाथ जाधव, आबासाहेब आप्पासाहेब साळुंके, शुभम शेषेराव पाटील, किसन रामलिंग साळुंके यांचा जागीच मृत्यू झाला.

Accident News : लातूरमध्ये भीषण अपघात, आयशर टेम्पोला बीएमडब्ल्यूची धडक, ४ जणांचा मृत्यू
Gadchiroli : धक्कादायक! सरकारी रूग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, कुटुंबियांचा डॉक्टरांवर आरोप, गडचिरोलीत नेमकं काय झालं?

अपघातात जयहिंद विश्वास जाधव आणि विनायक श्रीकांत हालदर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच औशाचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com