CNG Price Drop In Nagpur : नागपूरकरांसाठी खूशखबर, CNGच्या दरात १० रुपयांची घसरण; चेक करा लेटेस्ट दर

Nagpur News : कपातीनंतर सध्या नागपुरात सीएनजीचे 89.90 रुपये प्रति किलो आहे.
CNG News
CNG NewsSaam Tv

Nagpur News : महागाईने त्रस्त नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये CNG च्या दरात मोठी कपात झाली आहे. सीएनजीच्या दरात तब्बल 10 रुपयांनी कपात झाला आहे. कपातीनंतर सध्या नागपुरात सीएनजीचे 89.90 रुपये प्रति किलो आहे.

एक वर्षात नागपूरमध्ये सीएनजीचे दर 26 रुपयांनी कमी झाले झाले आहेत. मागच्या वर्षी आगस्ट महिन्यात नागपूरमध्ये सीएनजीचे दर 116 रुपये प्रति किलो होते. आंतराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्याने ही घसरण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

CNG News
Malaysia Plane Crash Video : मलेशियात चार्टर प्लेन महामार्गावर कोसळलं; १० जणांचा मृत्यू, घटनेचा VIDEO आला समोर

पेट्रोल-डिझेलच्या दरातही कपात होणार?

महागाई कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलण्याचा तयारीत आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

CNG News
Delhi - Pune Vistara flight: दिल्ली-पुणे विमानात सकाळी-सकाळी बॉम्बच्या धमकीचा फोन; तपासणीनंतर सत्य आलं समोर

सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या करात मोठी कपात करण्याची शक्यता आहेत. केंद्र सरकारने कपात केल्यानंतर राज्यांवर कर कमी करण्याचा दबाव वाढेल. त्यामुळे राज्यानुसार देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com