Satara : अमर रहे... जवान नायब सुभेदार शंकर उकलीकर अमर रहे... शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप द्यायला जनसागर लोटला

हुतात्मा शंकर उकलीकर यांची मुलगी स्वरांजली व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
shankar ukalikar
shankar ukalikarsaam tv
Published On

Satara News : अमर रहे... अमर रहे... जवान नायब सुभेदार शंकर उकलीकर (Jawan Nayab Subhedar Shankar Ukalikar) अमर रहे... अशा घाेषणा देत जनसागराने हुतात्मा जवान नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर यांनी अखेरचा निराेप दिला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी वसंतगड (ता. कराड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (Maharashtra News)

shankar ukalikar
Tuljapur Bandh News : तुळजापुरातील पुजारी, व्यापारी, स्थानिकांनी विकास आराखड्याच्या मुद्यावर सरकारला सुनावले (पाहा व्हिडिओ)

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वसंतगड येथील सैन्य सेवेत 112 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले नायब सुबेदार उकलीकर शंकर बी. हे जम्मू -काश्मीर राज्यातील लेह येथे (10 ऑक्टोबर 2023) हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव गावी वसंतगड येथे आणण्यात आल्यानंतर हजाराे युवक गावी जमा झाले.

shankar ukalikar
Bachchu Kadu On Bureaucracy : मंत्रालयाचे सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधरेल : बच्चू कडू

यावेळी ग्रामस्थांसह खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय पाटील यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकारी व आजी माजी सैनिकांनी हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून त्यांना मानवंदना दिली. यानंतर पत्नी पूजा, मुलगी स्वरांजली, आई सुशीला व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

हुतात्मा शंकर उकलीकर यांची मुलगी स्वरांजली व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

Edited By : Siddharth Latkar

shankar ukalikar
Sulkud Pani Yojana : कोण म्हणतं देत नाही... सुळकुडच्या पाण्यासाठी इचलकरंजीत आंदाेलन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com