Dhule Crime News: धुळ्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त; सोनगीर पोलिसांची धडक कारवाई

Cannabis Seized In Dhule: पेट्रोलिंग दरम्यान शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारी कार भरधाव वेगात जात असताना सोनगीर पोलिसांना संशयास्पद आढळून आली.
Cannabis Seized In Dhule
Cannabis Seized In Dhuleभूषण अहिरे

Dhule Crime News: कारमधून अवैधरित्या वाहून नेला जात असलेला लाखो रुपयांचा गांजा सोनगीर पोलिसांनी जप्त केला आहे. पेट्रोलिंग दरम्यान शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारी कार भरधाव वेगात जात असताना सोनगीर पोलिसांना संशयास्पद आढळून आली. या कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा सापडला आहे. (Cannabis Seized In Dhule)

Cannabis Seized In Dhule
MNS News: मनसे नरमली! राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखणाऱ्या भाजप खासदारांबाबत 'अतिथी देवो भव:'ची भूमिका

पोलिसांनी कार चालकाला वाहन थांबवण्यासंदर्भात इशारा देखील दिला, परंतु संबंधित कारचालकाने पोलिसांना हुलकावणी देत कार वेगात पळविली. पोलिसांनी या कारचा पाठलाग करून या कारला अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु कार चालकाने अखेर कार रस्तावर थांबवत कार सोडून पळ काढला. (Maharashtra News)

यानंतर सोनगीर पोलिसांनी (Dhule Police) संबंधित कारची तपासणी केली असता त्यामध्ये 119 किलो वजनाचा गांजा आढळून आला आहे, ज्याची बाजारामध्ये 9 लाख 56 हजार 480 रुपये मानली जात आहे. या कारवाईत गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत एकंदरीत 14 लाख 56 हजार 480 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोनगीर पोलिसांच्या या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले असून या कारवाई संदर्भातील पुढील तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com