Buldhana News: खाकी वर्दीला सलाम! बेवारस बाळाला महिला पोलिसाने पाजले दूध; मायेचा पाझर पाहून नेटकरीही भावुक

Buldhana News: सध्या बुलढाणामधून अतिशय वेगळी बातमी समोर आलेली आहे. ज्यात आपल्याला खाकी वर्दीतील ममतेचे रुप पाहण्यास मिळाले आहे.
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv
Published On

संजय जाधव, बुलढाणा|ता. १५ सप्टेंबर

''सद रक्षणाय, खल निग्रहणाय" हे घोषवाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात, कधी-कधी पोलिसांना खाकी दाखवावे लागतेच, मात्र या खाकी मध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकित एक वडीलाचे प्रेम,एक आईची 'ममता' लपलेली असते.याचा प्रत्यय बुलढाणा शहरातून समोर आलाय, एका दिवसाची भुकेली असलेल्या अनोळखी चिमुकली मुलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारीने चक्क आपल स्वतःचा दूध पाजून त्या चिमुकलीला शांत करून तिची भूक भागवलीये.

या महिला कर्मचारीने केलेल्या या कार्यामुळे त्यांच सर्वत्र कौतुक तर होतच आहे. मात्र या घटनेमुळे खाकीमधली 'ममता' देखील सर्वांसमोर आलीये. अनोखळी एका दिवसाच्या भुकेली चिमुकलीला स्वतःच दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचारीचे ''योगिता शिवाजी डुकरे'' असे नाव आहे. या महिला पोलिस बुलढाणा (buldhana) शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

कसे घडले?

लोणार येथून एका इसमाने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी ३ सप्टेंबर शनिवारी आणले होते, परंतु अनाथ आश्रमाने पोलिसांत तक्रार नोंदवण्यास सांगितले .दरम्यान तो इसम या चिमुकलीला त्याच रात्री साधारण साडे आठवाजेच्या सुमारास बुलढाणा पोलिसात तक्रार देण्यासाठी पोहचला.ही चिमुकली एका वेड्या बाईची असल्याची सांगून ती मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात (Ashram) टाकण्यासाठी आणल्याचे या इसमाने पोलिसांसमोर कथन केले.

सकाळ पासून ही एक दिवसाची चिमुकली या इसमाकडे असल्याने ती उपाशी होती,याच कारणाने ती व्याकुळ होऊन उंबरठा फोडत होती, याच वेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडतांना पाहताय त्यांच्यामधील 'ममता' जागृत होवून त्यांना कळलं की ही चिमुकली उपाशी आहे. आणि त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला (New Baby) स्वतःच दूध पाजून शांत केलं.

धक्कादायक कारण उघडकीस

दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी त्या चिमुकलीबाबत तपास केला असता ज्या इसमाने त्या चिमुकलीला आणलं होतं त्या इसमाच्या सोळा वर्षीय मुलीची ती चिमुकलीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध लोणार पोलिसांत् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या चिमुकलीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. सद्या या चिमुकलीची परिस्थिती चांगली असून तिचे वजन कमी असल्यामुळे तिला तीन आठवड्यापर्यंत रुग्णालयातच ठेवून उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली होती.

एका अनोळखी एका दिवसाच्या भुकेली चिमुकलील कोणतीही पर्वा न करता महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांनी आपले स्वतःचे दूध पाजल्याने महिला पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांचा सर्व स्तरावरून कौतूक होत आहे.आणि पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांच्या या प्रशंनिय कार्यामुळे पोलीस (Police) खात्याची प्रतिमा उंचावलीये.

याच कारणाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचारी (Employee) योगिता डुकरे यांची संजय गायकवाड यांनी दखल घेत तिचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सत्कार केलाय , शिवाय स्तनपान कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी योगिता डुकरे यांना ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवडले गेले तर अन्य महिला देखील योगिता डुकरे सारखे निसंकोजपणे आपल्या बाळाला स्तनपान करतील एवढे मात्र नक्की.

Buldhana News
Maha vikas aghadi : महाविकास आघाडीचा ४ जागांचा तिढा कायम, बैठक पुन्हा ठरली निष्फळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com