Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना रेशनवर साडी फ्री? लाडकीचा सण नव्या साडीने साजरा होणार?

Ladki Bahin Yojna : एका बाजूला निकषांची कडक पडताळणी करत लाखो लाडक्या अपात्र ठरत असताना दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पात्र लाडक्या बहिणींना सरकारनं मोठ्ठं गिफ्ट देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna SaamTV
Published On

मुंबई : लाडक्या बहिणींचे आणखी लाड करण्याचा तयारी महायुती सरकार आहे. लाडक्या बहिणींना आता फ्री साड्या देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या साड्या कुठे मिळणार? आणि कोणत्या सणाला ह्या साड्या मिळणार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

एका बाजूला निकषांची कडक पडताळणी करत लाखो लाडक्या अपात्र ठरत असताना दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. पात्र लाडक्या बहिणींना सरकारनं मोठ्ठं गिफ्ट देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अंत्योदय शिधा पत्रिकाधारक लाडक्या बहिणींना रेशन दुकानावर अन्नधान्यासोबत साडीही मोफत मिळणार आहे. सणासुदीच्या दिवशी या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे.या उपक्रमाची अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार ८७४ शिधापत्रिकाधारकांना अर्थात महिलांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, कोणत्या तालुक्यातील किती महिलांना लाभ मिळेल पाहुयात.

Ladki Bahin Yojna
IND vs BAN Highlights: गिलने पुन्हा जिंकलं 'दिल', बांगलादेशचा हार्टब्रेक करत टीम इंडियाची विजयी सुरुवात

पुणे जिल्ह्यात लाडकीला साडी फ्री?

आंबेगाव 5137

बारामती 7975

भोर 1909

दौंड 7222

हवेली 251

इंदापूर - 4453

जुन्नर - 6838

खेड - 3218

आता सरकारने साड्या देण्याचा घाट घातलाय खरा. पण त्या साड्यांची गुणवत्ता कशी असेल ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सोबतच महिलांना साडीचा आवडता रंग मिळेल की राज्यभर युनिफॉर्मसारख्या एकाच रंगाच्या साड्यांचे वाटप होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Ladki Bahin Yojna
'आई शप्पथ, ताजमहालपेक्षाही भारी स्मारक बनवणार', आग्र्यात शिवछत्रपतींचं भव्य स्मारक उभारणार; फडणवीसांची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com