'लाडकी'योजनेत मोठा स्कॅम, १२४३१ लाडक्या भावांची घुसखोरी, वर्षभर घेतले ₹१५००

Fadnavis government :महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल १२४३१ पुरुषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतला. वर्षभर प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मिळवत २४ कोटींपेक्षा जास्त रक्कम हडप केल्याचे आरटीआयमधून स्पष्ट झाले आहे.
Maharashtra Cabinet
Maharashtra Cabinet Saam Tv
Published On

Mukhyamantri Majhi Ladki ahin Yojana: महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. १२ हजारांपेक्षा जास्त पुरूषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचे १२ हजार पुरूषांनी प्रत्येक महिन्याला १५०० रूपये लाटले आहे. ही माहिती समोर आल्यानंततर ही तर लाडके भाऊ योजना असल्याची टीकी केली जातेय. (how 12431 men got money in ladki bahin yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सूरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. लाभार्थ्यांची आकडेवारी, सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटलेले पैसे तर कधी केवायसी योजना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतेच. आता यामधील मोठा स्कॅम समोर आला आहे. माहिती अधिकात १२ हजार ४३१ पुरूषांनी वर्षभरापासून या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून या पैशांची वसूल केली नसल्याचेही समोर आले आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचे वृत्त दिले आहे.

Maharashtra Cabinet
Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

लाडकी बहीण योजनासंदर्भात माहिती अधिकारात सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबाबत सरकारकडून काही माहिती दिली आहे. त्यानुसार, मागील वर्षभरात १२४३१ पुरूषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. पुरूषांनी लाभ घेतल्याचे याआधी फक्त दावे केले जात होते. पण आता याबाबत सरकारकडूनच अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या सर्व लाभार्थी लाडक्या भावांना यादीतून काढण्यात आले. पण त्यांनी आतापर्यंत प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा लाभ घेतला, त्याचं काय? त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet
Gold Rate : लक्ष्मीपूजनाला सोन्याची दिवाळी, तब्बल 3 हजार 300 रुपयांनी महागलं, वाचा आजचे दर

१२४३१ पुरूषांनी प्रत्येक महिन्याला सरकारच्या तिजोरीतून १५०० रूपयांचा लाभ घेतला. आतापर्यंत या अपात्र लाडक्या भावांनी २४ कोटी २४लाख रूपये लाडकीचे पैसे हडप केले आहेत. तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे १४०.२८ कोटींचा भुर्दंड सरकारला बसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. इतकी नावे समोर आली असली तरी अद्याप कोणत्याही व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या लाभाच्या वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली नाही.

Maharashtra Cabinet
Diwali bonus issue : बोनस दिला नाही, कर्मचारी संतापले, असं काही केलं की मालकाला बसला शॉक | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com