Ladki Bahin Yojana: नागपूरातील हजारो लाडक्या बहिणी नावडत्या, अर्ज झाले बाद, फेब्रुवारीपासून १५०० रुपये बंद

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. नागपूरमधील हजारो महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ५ लाख महिलांचे अर्ज झाले आहेत. यामध्ये चारचाकी वाहन असणाऱ्या महिला, दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचा समावेश आहे. या योजनेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरामधील महिलांचे हजारो अर्ज बाद करण्यात आले आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: आता पुन्हा लाडक्या बहिणी होणार खूश, 'या' दिवशी येणार फेब्रुवारीचा हप्ता

नागपूरमध्ये १२२८ महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. नागपुरातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यामुळे आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत.

नागपूरच्या १२२८ लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन आहे. यात कटोलमधील १२१ महिला आहे. नरखेडमधील ५ तर नागपूर ग्रामीणमधील १, सावनेरमधील १ महिला आहे. या महिलांचे अर्ज बद केले जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील जवळपास ९.८४ लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठ अर्ज केले होते.त्यातील अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद झाले आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: सत्तेत आलेल्या तीन भावांची महाराष्ट्रातील लाखो बहिणींशी गद्दारी: नाना पटोलेंचा टोला

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे.या योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी पाच टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यामध्ये एका कुटुंबातील दोन व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचीही पडताळणी केली जाणार आहे. कुटुंबातील किमान एका सदस्याला निवृत्तीवेतन असेल त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच पाच एकरपेक्षा जास्तजमीन नाही ना याचीही तपासणी केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण होणार मालामाल; 'या' दिवशी खात्यात पैसे येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com