
लाडकी बहीण योजनेच्य लाभार्थ्यांची पडताळणी सुरु
नागपूरमधील ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करताना माहिती उघड
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामधून लाखो महिलांना आता बाद करण्यात आले आहे. त्यानंतर आता नागपूर (Nagpur) जिल्ह्यात ६१,१४६ लाडक्या बहिणी अपात्र असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत.
आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही घेतला लाभ
घरची आर्थिक स्थिती चांगली असताना देखील घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेची अट अशी होती की, ज्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो. परंतु या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे काही पुरुषांचा देखील यामध्ये समावेश आहे.
अपात्र लाभार्थ्यांना प्रशासनाने योजनेतून हद्दपार केले आहे. त्यामुळे त्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.नागपूर जिल्ह्यात एकूण पाच लाख ८० हजार ४१३ जणांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते.
नागपूरमधील ६१,१४६ महिला योजनेतून बाद (Ladki Bahin Yojana 61,146 women ineglible)
अर्ज दाखल केल्यानंतर सुरुवातीचे हप्तेही त्यांच्या खात्यात जमा झाले.मात्र छाननी नंतर यातील ६१,१४६ अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे आता ६१,१४६ महिलांना इथून पुढे १५०० रुपये मिळणार नाहीत.
एकूण ५० लाख महिलांचे अर्ज बाद (Ladki Bahin Yojana 50 lakh Women Benefit Stopped)
लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. यातील काही महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत. तर अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. अनेक महिलांकडे चारचाकी वाहन आहे. जवळपास अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.