Ladki Bahin Yojana: नाराज लाडक्या बहिणींचा सरकारला थेट इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देणार

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांचा लाभ बंद करण्यात आला. पैसे येणं बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. त्यांनी थेट सरकारला इशारा दिला.
Ladki Bahin Yojana: नाराज लाडक्या बहिणींचा सरकारला थेट इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देणार
Ladki Bahin YojanaSaam tv
Published On
  • लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांमध्ये तीव्र नाराजी

  • आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा लाडकींचा इशारा

  • पात्र असूनही नाव वगळल्याचा महिलांचा आरोप

  • योजनेच्या भरवशावर घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करणार? लाडकींचा सवाल

भूषण अहिरे, धुळे

लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविलेल्या लाभार्थी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. या लाडक्या बहिणींनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवून देणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात लाडकींची नावे वगळण्यात आल्यानंतर लाडकींचा राज्य सरकारविरोधात संताप बघायला मिळत आहे.

'गरज सरो आणि वैद्य मरो', अशा पद्धतीने राज्य सरकारने आमचा वापर केला असल्याचं म्हणत लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या संतप्त लाडकींनी राज्य सरकारमधील सर्वच पक्षांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपली जागा दाखवून देण्याचा थेट इशारा दिला आहे.

Ladki Bahin Yojana: नाराज लाडक्या बहिणींचा सरकारला थेट इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देणार
Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मे-जून हप्त्याची महत्त्वाची अपडेट

सर्व निकषांमध्ये बसत असताना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले असल्याचा आरोप लाडकींनी केला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ योजना सुरू झाल्यापासून घेत असलेल्या लाडकींनी या योजनेच्या आणि महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या भरवशावर बचत गटाचे कर्ज देखील घेतले. परंतु आता राज्य सरकारने आपली गरज संपल्यानंतर या योजनेतून बाद केल्यामुळे आता या घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडायचा कसा असा प्रश्न योजनेतून वगळण्यात आलेल्या लाडकींसमोर उभा राहिला आहे.

Ladki Bahin Yojana: नाराज लाडक्या बहिणींचा सरकारला थेट इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देणार
"मी नसतो तर तुरुंगात असता!" ट्रम्प यांनी फोनवर नेतान्याहूंना कडक शब्दात झापले; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ

धुणी- भांडी करून मोलमजुरी करणाऱ्या या लाडकींचे आर्थिक गणितच पूर्णतः कोलमडल्यामुळे या लाडकींचा संताप अनावर झाला आहे. याचे उत्तर राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांना आगामी निवडणुकांमधून देणार असल्याचा थेट इशाराच या लाडक्या बहिणींनी दिला आहे.

तर दुसरीकडे, विरोधी पक्षांनी देखील आता अशा लाडकींना हेरण्याचे काम सुरू केलं असून ज्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आता त्याच नाराज लाडकींचा वापर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांची खुर्चीला सुरुंग लावण्याचा विरोधक पूर्णपणे प्रयत्न करणार हे निश्चित आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अशा लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या नाराज लाडकींना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी नाराज लाडकींना आश्वासन दिले आहे.

Ladki Bahin Yojana: नाराज लाडक्या बहिणींचा सरकारला थेट इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देणार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० वर अपडेट आली, आज निर्णय होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com