Wai News : उत्खनन, क्रशिंग परवानगी रद्द करा, कुसगाव ग्रामस्थांचे वाईत कृष्णाकाठी आंदोलन

kusgaon villagers morcha against illegal mining at wai : पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान आगामी काळात आंदाेलन तीव्र करु अशा इशारा ग्रामस्थांनी दिला.
kusgaon villagers morcha against illegal mining at wai mahaganpati krishna river bank
kusgaon villagers morcha against illegal mining at wai mahaganpati krishna river bankSaam Digital

सातारा महसूल विभागाने वाई तालुक्यातील कुसगाव परिसरात दिलेली उत्खनन आणि क्रशिंगची दिलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी आज (शुक्रवार) वाईतील गणपती मंदिराच्या बाहेर असलेल्या कृष्णा नदीकाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी पाण्यात उतरुन परवानगी रद्द न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा प्रशासनास दिला.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बेकायदा उत्खनन करणे, क्रशिंग करणे याबाबत वेळोवेळी त्या-त्या गावांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यात आता कुसगाव या गावाच्या परिसरात महसूल विभागाने क्रशिंग करण्यासाठी डोंगराचा भाग दिला आहे. ज्या डोंगराच्या भागात हे उत्खनन सुरू होत आहे.

kusgaon villagers morcha against illegal mining at wai mahaganpati krishna river bank
Prithviraj Chavan On Porsche Car Case: महाराष्ट्रात श्रीमंतांसाठी वेगळा कायदा; पाेर्शे अपघात प्रकरणावरुन पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर राेख

ज्या गावालगत ही परवानगी दिली आहे. त्या परिसरातील ग्रामस्थांनी आणि इतर ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शवला आहे. या डोंगरात क्रशिंग करून दिले जाणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महसूल विभागाने दिलेली परवानगी रद्द करावी या कारणास्तव आज वाईतील गणपती मंदिराच्या बाहेर असलेल्या नदीकाठी आंदोलन करून ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.

Edited By : Siddharth Latkar

kusgaon villagers morcha against illegal mining at wai mahaganpati krishna river bank
उदयनराजेंना अश्रू अनावर, पत्नी दमयंतीराजेंनी सावरलं; नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com