Suraj Nikam : 'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा

Suraj Nikam ends life : 'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने जीवन संपवलं आहे. सूरज निकमच्या आत्महत्येनंतर कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा
Suraj NikamSaam tv

सांगली : सांगलीतून दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील पैलवान सूरज निकमने याने राहत्या घरी जीवन संपवलं आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सूरजने जीवन संपवलं आहे. सूरजच्या आत्महत्येमुळे कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सूरज निकम हा सांगलीतील नागेवाडीमधील नामवंत मल्ल आहे. सूरजने कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकावले आहेत. त्याचा विरोधी पैलवानाला चितपट करण्याचा त्याचा हातखंडा होता. नागेवाडीच्या पैलवानाने कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. त्याने कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. सूरजने कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्ल लोकांना अस्मान दाखवलं होतं.

'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा
Pune Crime News : दुचाकी चोरीच्या टाेळीचा मंचर पाेलिसांकडून पर्दाफाश, युवकास अटक; 14 बाईक जप्त

सूरज त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर व्यथित झाला होता. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्याने जीवन संपवलं. सूरज निकमच्या आत्महत्येनंतर कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

'कुमार महाराष्ट्र केसरी' सूरज निकमने संपवलं जीवन, कुस्ती क्षेत्रावर शोककळा
Chandrapur Crime News : आनंदवनात युवतीची हत्या, सेवाग्रामहून परतल्यानंतर पालकांना बसला माेठा धक्का

सूरज निकमच्या आत्महत्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी त्याचा भाऊ आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती हाती आहे. पैलवान सूरजच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी सूरजच्या आत्महत्येचं कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

आरक्षणासाठी युवकाने संपवलं जीवन

हिंगोलीत दोन दिवसांपूर्वी आर्थिक परिस्थिती आणि आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गजानन बोखारे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. हिंगोलीतील वसमत तालुक्यातील पांगरा गावातील घटना आहे. या तरुणाने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com