Koregaon Politics : कधी कुठे कुणाची शेपटी पिळून कुठे घोडा उधळवायचा हे चांगलं समजतं... काेरेगावात असं का म्हणाले आमदार महेश शिंदे (पाहा व्हिडिओ)

आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या 35 कोटींच्या निधीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी कोरेगाव नगरपंचायतीने त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले.
mla mahesh shinde
mla mahesh shindesaam tv
Published On

Satara News : राजकारणात सध्या सर्व काही ओके चालू आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री सर्व काही ओके आहे असे आमदार महेश शिंदेंनी नमूद केले. कोरेगाव येथे विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी अपात्रतेबाबत वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केली. (Maharashtra News)

mla mahesh shinde
Kolhapur Ganpati Visarjan : बाप्पांच्या विसर्जनासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पंचगंगा नदी परिसरात पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

कोरेगाव नगरपंचायतीच्या विविध विकास कामांच्या निमित्ताने शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे हे कोरेगाव शहरात आल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. (satara-political-news)

जेसीबीच्या मध्मातून पुष्वृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांनी दिलेल्या 35 कोटींच्या निधीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी कोरेगाव नगरपंचायतीने त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले.

mla mahesh shinde
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ६ दिवसांची परवानगी, वाचा जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

आमदार महेश शिंदे म्हणाले राज्य सरकार, मुख्यमंत्री सर्व काही ओके आहे. काहीजण स्वप्न बघत आहेत. कधी आम्ही आपात्र होतोय. पण आता असं म्हणत तेच अपात्र झाले असल्याची खोचक टीका शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता केली.

आम्ही साधे लोक आहोत. कुठे कुणाची शेपटी पिळून कुठे घोडा उधळवायचा हे चांगलं समजतं. त्यामुळे आमची चिंता करू नका तुमच्या अपात्रते नोटीसी बाबत उत्तर द्या. आमच्या महायुतीतील तीनही नेते सक्षम आहेत असा विश्वास देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

mla mahesh shinde
Mahadevrao Mahadik On Satej Patil : मी शेलारमामा, आलते शड्डू मारायला शिकवायला...फूकून उडवून टाकेन; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com