Chipi Airport : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईहून सिंधुदुर्ग अवघ्या १ तासात, १५ ऑगस्टपासून चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू

Sindhudurga Chipi Airport News : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळ ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे
MUMBAI TO SINDHUDURG DIRECT FLIGHT SERVICE FROM AUGUST 15 | CHIPI AIRPORT TO NAVI MUMBAI IN JUST 1 HOUR
MUMBAI TO SINDHUDURG DIRECT FLIGHT SERVICE FROM AUGUST 15 | CHIPI AIRPORT TO NAVI MUMBAI IN JUST 1 HOURSaam Tv
Published On
Summary
  • १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळ ते नवी मुंबई विमानसेवा सुरू

  • मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासाचा वेळ ७-८ तासांवरून अवघ्या १ तासावर येणार

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना मोठा दिलासा

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतून कोकणात जाण्यासाठी तब्बल ७ ते ८ तासांचा कालावधी लागतो, मात्र येत्या १५ ऑगस्ट पासून हा वेळ वाचणार आहे. कोकणातील नागरिक फक्त १ तासात कोकणात पोहचू शकतात. कारण १५ ऑगस्ट पासून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईपर्यंतची विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांचा प्रवासाचा वेळ वाचवता येणार आहे. दरम्यान गणेशोत्सव अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपला असून या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नितेश राणे यांनी सांगितले की, १५ ऑगस्टपूर्वी फ्लाय ९१ ही विमान कंपनी चिपी ते नवी मुंबई अशी सेवा सुरू करणार आहे. त्यानंतर लवकरच इंडिगोची विमानसेवाही या मार्गावर उपलब्ध होईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे.

MUMBAI TO SINDHUDURG DIRECT FLIGHT SERVICE FROM AUGUST 15 | CHIPI AIRPORT TO NAVI MUMBAI IN JUST 1 HOUR
Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी ही सेवा सुरू असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग ही थेट विमानसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांना आपल्या गावी ये-जा करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गावर अवलंबून राहावे लागत होते.

MUMBAI TO SINDHUDURG DIRECT FLIGHT SERVICE FROM AUGUST 15 | CHIPI AIRPORT TO NAVI MUMBAI IN JUST 1 HOUR
Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

आता नवी मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. याचा फायदा केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही तर, व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. दरम्यान विमान सेवा सुरु झाल्याने पर्यटकांना मुंबईतून सिंधुदुर्गमध्ये पोहोचणे अधिक सोपे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com