Konkan Politics: ऐन झेडपीच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; धडाधड ४३ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Faces Mass Resignations Before ZP Polls: जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी ४३ पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामा दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्गात भाजपला मोठा राजकीय धक्का बसलाय.
BJP Faces Mass Resignations Before ZP Polls
BJP flags seen at a party meeting amid political turmoil after mass resignations in Sindhudurg.Saam tv
Published On
Summary
  • झेडपी निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का

  • सिंधुदुर्गमध्ये 43 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

  • महायुतीच्या जागावाटपामुळे नाराजी

Summary

महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागताच भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेतले जात आहेत. मात्र त्याच दरम्यान कोकणातून भाजपची चिंता वाढवणारी बातमी हाती आली आहे. सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांनी एकामागून एक राजीनामे दिले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

BJP Faces Mass Resignations Before ZP Polls
Maharashtra Politics: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होताच माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा शिंदेसेना महायुतीची अधिकृत घोषणा केली. मात्र त्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. एकामागून एक अशी ४३ जणांनी आपले राजीनामे दिलेत.

BJP Faces Mass Resignations Before ZP Polls
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

सर्वात आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे उचित वाटत नाही. कोणत्याही नेत्याविषयी वैयक्तिक नाराजी नाहीये, आपला राजीनामा त्वरित स्वीकारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केलीय.

आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस भाजपा मंडळात खळबळ उडाली. त्यानंतर ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचाळकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिलेत. दरम्यान राजीनाम्यांची मालिकेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या जागावाटपाच्या चर्चेनंतर भाजपमध्ये नाराजी उफाळून आली. दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची गर्दी आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी आहे, परंतु सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असून त्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com