रणजीत माजगावकर, कोल्हापूर
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस (Kolhapur Rainfall) पडत आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरण (Radhanagari Dam) भरले आहे. या धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून भोगावती नदीत (Bhogawati River) पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
या पावासामुळे कोल्हापूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यावर सध्या पुराचं सावट घोंगावत आहे. या पुराचा धसका कोल्हापूरकरांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणामध्ये पाणीसाठा वाढला आहे. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले आहेत. पुढील 15 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. पाऊस वाढल्यास पूर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका अधिकारी अलर्ट आहेत.'
तसंच, 'शहरात काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर केलं आहे. आज दुपारपर्यंत लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. लोकांसाठी लागणारी सोय प्रशासनाने केली आहे. लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात अलर्ट दिला आहे. ज्यांना पुराची भीती वाटते त्यांनी घरे सोडून निवारा गृहात जावं. नागरिकांनी शेतात जाऊ नये.', असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. यामध्ये कोल्हापूरकरांची शेकडो वाहन पाण्यात बुडून खराब झाली होती.. कोल्हापूरकरांनी महापुराचा चांगलाच धसका घेतल्याने पूर येण्याआधीच खबरदारी म्हणून आपली वाहनं रस्त्यावर आणून लावण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपलं कार्यालय दुसऱ्या मजल्यावर हलवण्याच्या सूचना दिले. मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आंबेवाडी, प्रयाग, चिखली या गावांना पुराचा मोठा फटका बसतो. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या गावातील नागरिकांना ताबडतोब गाव सोडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आपली जनावर, संसारउपयोगी साहित्य घेऊन स्थलांतरित होत आहेत. दरम्यान, १५ दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये अति मुसळधार पाऊस पडत आहे.
या पावसामुळे जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी लोकांचं स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तब्बल 27 गावांमधील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.