सायबर चोरांचा पोलिसांनाच हजारो कोटींचा चुना, क्रिप्टोत नावाखाली पोलिसांनाच गंडा

Maharashtra Police Duped In Massive Crypto Investment Fraud: आता बातमी आहे साम टीव्हीनं केलेल्या इन्व्हेस्टीगेशनची... ही बातमी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...कारण हजारो कोटींची लूट झालीय. आणि तीही महाराष्ट्रातल्या हजारो पोलीस अधिकाऱ्यांची...कुणी आणि कसं लुटलंय पोलीस अधिकाऱ्यांना?? त्यावरचा साम टीव्हीचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट...
Police officers allegedly duped in a massive crypto investment scam as fake trading firms lure victims with high returns.
Police officers allegedly duped in a massive crypto investment scam as fake trading firms lure victims with high returns.saam tv
Published On

रमेश जाधव (नाव बदललेले)

पद - सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

जिल्हा - कोल्हापूर

गुंतवणूक स्कीम - बिट कॉईन, क्रिप्टो करन्सी

2 लाखांचा गंडा

ज्यांच्यावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस अधिकारी आता आर्थिक फसवणुकीचे शिकार झालेत...झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आणि दुप्पट- तिप्पट परताव्याच्या आमिषाला भुलून ट्रेडिंग कंपन्यांमध्ये गुंतवणुक करणाऱ्या पोलिसांनाच सायबर गुन्हेगारांनी चुना लावलाय...कोल्हापुरात तब्बल 300 हून अधिक पोलिसांना गंडा घातला गेलाय...पोलिस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात साम टिव्हीच्या प्रतिनिधीकडेच आपलं गाऱ्हाणं मांडलंय... - या पोलिसांना बोगस ट्रेडिंग कंपन्यांनी नेमका कसा चुना लावला ते पाहूयात...

कोल्हापूरात काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास सांगितले... एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील 300 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचे तब्बल 100 कोटींहून अधिक रुपये गुंतवले. यात क्रिप्टो करन्सी, बिट कॉईन आणि ऑनलाईन ट्रेडिंगच्या कंपन्यांचा समावेश आहे. काही अधिकाऱ्यांनी तर 10 लाखांपासून दीड कोटींपर्यंत रक्कम गुंतवल्याची चर्चा आहे...पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या नावासह कुटुंबीयांच्या नावानं वेगवेगळ्या कंपनीत गुंतवणूक केली...दुप्पट आणि तिप्पट परतावा देण्याचं सांगितल्यामुळे पोलीस अधिकारी भामट्यांच्या आमिषाला बळी पडले. सुरुवातीला हमीनुसार परतावा देण्यात आला... काहींना महिन्याभरातच नफा मिळाला तर काहींना बोनसही मिळाला...त्यामुळे अधिकाऱ्यांनी गुंतवणूक वाढवली. दुबई, मलेशिया, सिंगापूर आणि अमेरिकेत कंपन्यांची मुख्यालयं असून, मुंबई-पुण्यात उपकार्यालयं असल्याचं भासवलं गेलं...काही पोलिसांनी तर पुण्यातल्या आलिशान कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आणि तिथल्या 'हायफाय' वातावरणाला भुलले.

आता पोलीसच गुंतवणूक करत असल्याचं पाहून त्यांच्या काही मित्रांनी आणि इतर सामान्यांनीही या कंपन्यांमध्ये आपल्या कष्टाचे लाखो रुपये गुंतवले. मुळात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली तर पोलीस तपास करतात..मात्र आता पोलिसांचीच फसवणूक झाली तर तपास कोण करणार? असा प्रश्न फसवणूक झालेल्या पोलिसांना पडलाय. विशेष म्हणजे वरिष्ठांकडे दाद मागूनही उपयोग नसल्याचं हतबलता काही पोलिसांनी बोलून दाखवली.

कोल्हापूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला असला तरी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरांमध्येही सायबर गुन्हेगारांनी अनेक पोलिसांना गंडा घातल्याचा संशय आहे...त्यामुळे याची पाळंमुळं राज्यभरात पसरल्याचं बोललं जातंय. ज्या पोलिसांनी आपल्या कष्टाचा कमाईचा पैसा यात गुंतवला ते समोर आले आहेत. मात्र मोठी गुंतवणूक केलेले आणि फसवणूक झालेले पोलीस अधिकारी चौकशी ससेमीरा टाळण्यासाठी पुढे येत नसल्याचं दिसतंय. आणि यामुळेच या प्रकरणाचा सखोल तपास होणार का? राज्यभरात लाखोंचा गंडा घालणाऱ्या या सायबर गुन्हेगारांना आळा बसणार का? की हापापाचा माल गपापा म्हणत हे प्रकरण दाबलं जाणार? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com