Offensive Videos Viral In Kolhapur : डॉक्टरांना देव म्हटले जाते. परंतु कोल्हापुरातील एका डॉक्टरने तपासाणीसाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ शूट करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
या डॉक्टरने त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओ बनवले. यातील सुमारे 70 ते 80 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुमारे 400 महिलांनी पत्र लिहून या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉक्टरने स्वत: शूट केले व्हिडिओ
आरोपी डॉक्टरने स्वत: या सर्व क्लिप बनवल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. या डॉक्टरने त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक क्लिप साठवून ठेवल्या होत्या. त्याने लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला तेव्हा या सर्व क्लिप व्हायरल झाल्या.
या क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील बहुतांश स्थानिक महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता तक्रारदार महिलांकडून केली जात आहे. (Kolhapur News)
महिलां आणि तरुणींसोबत गैरकृत्य
मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील मुरगूड येथील हा डॉक्टर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या व्यवसायाची जाहिरात करत होता. ही जाहिरात पाहून आजूबाजूचे अनेक लोक त्याच्याकडे उपचारासाठी येत होते.
याचाच फायदा घेत त्याने उपचारासाठी आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओही बनवले. यात स्थानिक महिलांसह तरुणींचा देखील समावेश असल्याचे कळतेय.
एकाच वेळी ४०० महिलांनी केली तक्रार
डॉक्टरने शूट केलेल्या क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. भीतीपोटी आतापर्यंत कोणीही तक्रार केली नव्हती. परंतु शनिवारी 400 हून अधिक पीडित महिलांनी निनावी पत्रे लिहून एकाच वेळी शहरातील आधिकाऱ्यांना मेल केले.
तसेच अज्ञात व्यक्तीने व्हायरल होत असलेले व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये घेऊन शहरातील प्रमुख राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पोस्टाने पाठवले आहेत. या पत्रांमधून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (Crime News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.