Kolhapur News: कोल्हापुरात WhatsApp स्टेटसमुळे तणाव; दोन गट आमने-सामने

कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गट आमने-सामने आले आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam tv
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News: कोल्हापुरातून मोठं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापुरात व्हाट्सअप स्टेटसमुळे दोन गट आमने-सामने आले आहेत. यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही गट रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे पोलिसांनी आक्रमक गटावर लाठीमार देखील केला. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. (Latest Marathi News)

कोल्हापुरात (Kolhapur) एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सअॅप वादग्रस्त स्टेटसमुळे तणाव निर्णाण झाला आहे. यावरून कोल्हापुरात दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. या वादग्रस्त स्टेटसमुळे शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याच्या घटना देखील घडल्या.

Kolhapur News
Manipur Clashes: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार! बीएसएफचा एक जवान शहीद, तर आसाम रायफल्सचे 2 जवान जखमी

रस्त्यावर तणाव वाढल्याने पोलीस (Police) देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शहरात रस्त्यावर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात काही ठिकाणी पोस्टर जाळण्याचा घटना देखील घडल्या आहेत.

संगमनेरमधील 'भगवा' मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती गुन्हेगारी आणि लव्हजिहाद विरोधात भगवा मोर्चा काढण्यात आला होता. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी आज कडकडीत बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले. मात्र या मोर्चाला गालबोट लागलं आहे

संगमनेर शहराजवळील समनापूर गावात दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला आहे. अनेक गाड्यांचे यात नुकसान झाले आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

Kolhapur News
Virar News: विरारमध्ये निर्माणाधीन इमारातीची भिंत कोसळली; ३ महिला कामगारांचा मृत्यू

परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलीस घटनास्थळी दाखल आहेत. सध्या समनापूर गावात तणावाची परिस्थिती आहे. मोर्चादरम्यान वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com