Kolhapur News : भावानं बहिणीचा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयात आणला, नेमकं काय घडलं?

Kolhapur Latest news : कोल्हापुलातील एक तरुणाने बहिणीचा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाने मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आणल्याने एकच खळबळ उडाली.
भावानं बहिणीचा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयात आणला, नेमकं काय घडलं?
Kolhapur News Saam tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टीव्ही प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने त्याच्या मृत बहिणीची मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. तरुणाने मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. ख्रिश्चन समाजाच्या तरुणाने त्याच्या बहिणीचा मृतदेह कार्यालयात आणला होता.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिश्चन समाजाकडून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे. या स्मशानभूमीसाठी ख्रिश्चन समाजाने अनेकदा आंदोलन देखील केले आहे. या स्मशानभूमीसाठी मागील २-३ वर्षांपासून ख्रिश्चन समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच मागणीसाठी ख्रिश्चन समाजाच्या तरुणाने मृत पावलेल्या त्याच्या बहिणीचा मृतदेह कार्यालयात आणला. ख्रिश्चन समाजाला दफनभूमीची जागा उपलब्ध होत नसल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्या कार्यालयाच्या दारात तरुणाने त्याच्या बहिणीचा मृतदेह आणला.

भावानं बहिणीचा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयात आणला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Politics: महायुतीमधील संघर्ष शिगेला! शिंदेसेनेच्या आमदाराचे राष्ट्रवादीवर दगाबाजीचे आरोप; रायगडमध्ये राजकारण तापलं

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

ख्रिश्चन समाजाच्या तरुणाने मृत पावलेल्या बहिणीचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. त्यानंतर कार्यालयात एकच गोंधळ उडाला. ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी, यासाठी त्याने बहिणीचा मृतदेह कार्यालयात आणला. बहिणीचा मृत्यू झाल्याने मृतदेह दफन कुठे करायचं हा प्रश्न तरुणाने उपस्थित केला. या प्रकारानंतर पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे आक्रमक तरुण शांत झाला. यावेळी लवकरच जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिलं.

भावानं बहिणीचा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयात आणला, नेमकं काय घडलं?
kolhapur Traffic Routes: राष्ट्रपती उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, शहरात मोठा वाहतूक बदल, पाहा कोणता मार्ग बंद, कोणता सुरु?

पोलिसांनी दिलं तरुणाला आश्वासन

कोल्हापुरातील ख्रिश्चन समाजाकडून दफनभूमीची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तरुणाने त्याच्या मृत बहिणीचा मृतदेह टेम्पोतून कार्यालयाच्या दारात आणला. दफनभूमीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या तरुणाची पोलिसांनी समजूत काढली. पोलिसांनी तरुणाला जिल्हाधिकारी एडके यांच्या सोबत भेट घालून देण्याचं आश्वासन दिलं. पुढे मृतदेहाची हेळसांड नको, त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com