Kolhapur Jyotiba Temple: ज्योतिबा मंदिरात राडा; पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, डोक्यात नारळ फोडलं, VIDEO व्हायरल

Jyotiba Temple: कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात भाविकांवर पुजाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाली आहे. या प्रकरणात 15 पुजारी आणि 15 भाविकांविरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Kolhapur Jyotiba Temple
Kolhapur Jyotiba TempleSaam Tv
Published On

रणजीत माजगावकर, साम टिव्ही

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून परीते गावातील दोन भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर परिसरात काल परिते गावातील काही नागरिक दर्शनासाठी गेले होते. यावेळी पुजारी आणि या नागरिकांमधून तुंबळ हाणावरी झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

ज्योतिबा मंदिरात 15 ते 20 पुजाऱ्यांनी मिळून दोन भाविकांवर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित पुजारी भाविकांच्या अंगावर अक्षरशः तुटून पडल्याचे दिसत आहे. इतकंच नाही, तर दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ मारल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एका बाजूला काही नागरिक मद्यप्राशन करून हुलडबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच देव कार्यात आणि देवाच्या छबिना सोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.

Kolhapur Jyotiba Temple
Nora Fatehi: नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ; वर्क परमिट होणार रद्द, भारतातून केलं जाणार हद्दपार?

तर दुसरीकडे पुजाऱ्यांनी अरेरावी करत भाविकांना मारहाण केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. या प्रकरणात परिते गावातील भाविकांना पुजाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आहेत ते देवस्थानला या संदर्भात जाब देखील विचारणार आहेत. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्या भाविकासंदर्भात कालच्या घटनेचा निषेध नोंदवत आज संपूर्ण ज्योतिबा डोंगरावरील दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत.

Kolhapur Jyotiba Temple
सत्ताधाऱ्यांचा डाव उधळला? उद्धव ठाकरे आणि खासदारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मात्र कालच्या या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात 15 पुजारी आणि 15 भाविकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com