Kolhapur Flood Situation: अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; 'पंचगंगेने' इशारा पातळी ओलांडली

Kolhapur Flood Situation Latest News: कोल्हापूरातील पंचगंगा नदीने आता इशारा पातळी ओलांडली असून तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात.
Kolhapur Flood Situation: अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; 'पंचगंगेने' इशारा पातळी ओलांडली
Kolhapur Flood Situation Latest News: Saamtv
Published On

रणजित माजगावकर, ता. २३ जुलै २०२४

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अखेर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्ह्याला पुराने वेढा दिला आहे. आता पंचगंगा नदीच्या पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली असून जिल्ह्यातील तब्बल 78 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Kolhapur Flood Situation: अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; 'पंचगंगेने' इशारा पातळी ओलांडली
Satara Politics: 'मॅचफिक्सिंग, नुरा कुस्ती चालणार नाही, वस्ताद योग्य उमेदवार देणार,' खासदार धैर्यशील मोहितेंचा जयकुमार गोरेंना टोला

कोल्हापूरातील पंचगंगा नदीने आता इशारा पातळी ओलांडली असून तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. सध्याची पाण्याची पातळी 40.11 फुटांवर आहे. शिवाय जिल्ह्यातील तब्बल 78 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी जेव्हा इशारा पातळी ओलांडते तेव्हा कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात.

सध्या पंचगंगा इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे चालली आहे. प्रयाग चिखली या गावात भोगावती-तुळशी, कुंभी-कासारी आणि सरस्वती ही गुप्त नदी आशा पाच नद्यांचा संगम होतो आणि तिथून पुढे पंचगंगा नदीची सुरुवात होते. त्याच प्रयाग चिखली येथे सध्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Kolhapur Flood Situation: अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; 'पंचगंगेने' इशारा पातळी ओलांडली
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडणार; सर्वसामान्यांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार?

दरम्यान, पंचगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबरही जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी ९२०९२६९९९५ हा मोबाईल क्रमांक कोल्हापूर हेल्पलाईन म्हणून सेव्ह करावा, व्हॉटसअप वरून या नंबर वर १ ते ६ पैकी क्रमांक मेसेज करावेत. पाऊस, धरण पाणी पातळी, रस्ते, इ. बाबतची सर्व माहिती प्राप्त होईल.

Kolhapur Flood Situation: अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; 'पंचगंगेने' इशारा पातळी ओलांडली
Pune Water Cut : भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट; येत्या गुरुवारी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com