Kolhapur Fire News: कोल्हापुरात पेट्रोल पंपाजवळील इमारतीला भीषण आग; अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

कोल्हापूर शहरातून एक आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर सिग्नलजवळ एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली.
Kolahapur Fire News
Kolahapur Fire NewsSaam tv
Published On: 

रणजीत माजगावकर

Kolhapur Fire News: कोल्हापूर शहरातून एक आगीचं वृत्त हाती आलं आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर सिग्नलजवळ एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे. (Latest Marathi News)

कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात असणाऱ्या बाजीराव संकुल या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून आज दुपारच्या सुमारास आगीचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

सर्वात आधी या इमारतीला लागून असलेल्या पेट्रोल पंपावरील वाहने आणि गर्दी स्थानिकांनी हटवली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली आहे.

Kolahapur Fire News
Nitesh Rane On Uddhav Thackeray: ठाकरेंचं कर्जतमधील फार्महाऊस खोदलं 2000च्या नोटांचा ढिग सापडेल; राणेंचा गंभीर आरोप

दरम्यान, या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसलं तरी या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या या इमारतीमध्ये एका खोलीत लक्ष्मी पाटील आणि मेघनाथ पाटील हे राहतात. त्यांच्या खालील खोलीमध्ये रामनाथ पाटील राहतात. इतर सर्व खोल्या रिकाम्या आहेत.

Kolahapur Fire News
#shorts : Kolhapur शहरातला कार्यक्रम किती कार्यकर्ते आले ही आपली अवस्था

इमारतीतील खुल्या जागेमध्ये जुने फर्निचर आणि लाकडी वस्तू पडल्या होत्या. या घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, अमित जाधव, मधुकर जाधव, रजाक मुलानी, मेहबूब जमादार, माणिक कुंभार, विशाल चौगुले यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आग लागल्यानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com