खबऱ्यांकडून टीप मिळाली, हायवेवर ट्रक अडवून झडती घेतली; बिश्नोईला बेड्या ठोकल्या! नेमकं काय घडलं?

Fake Goa Liquor Worth Rs 1.30 Crore Seized In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावट विदेशी दारूचा १ कोटी ३० लाख रुपयांचा साठा जप्त केला.
Excise officials inspect the truck after seizing fake Goa-made liquor worth ₹1.30 crore on Kolhapur highway.
Excise officials inspect the truck after seizing fake Goa-made liquor worth ₹1.30 crore on Kolhapur highway.Saam Tv
Published On
Summary
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोल्हापूरमध्ये मोठी धडक कारवाई

  • गोवा बनावट विदेशी दारूचा १.३० कोटींचा साठा जप्त

  • निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाईला वेग

  • ट्रक, दारू साठा आणि मोबाईलसह मुद्देमाल जप्त

  • राजस्थानच्या चालकाला अटक, पुढील तपास सुरू

कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावट विदेशी दारूचा तब्बल १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा साठा वाहनासह जप्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Excise officials inspect the truck after seizing fake Goa-made liquor worth ₹1.30 crore on Kolhapur highway.
ZP Election: ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; उमेदवारी नाकारताच कमळाकडे धाव, बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे भरारी पथक क्रमांक १ ने शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा फाटा, राजापूर–मलकापूर रोडवर पहाटे साडेपाचच्या सुमारास संशयित अशोक लेलँड ६ चाकी ट्रक थांबवून तपासणी केली. या ट्रकमधील कंटेनरमध्ये गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे १,६०० बॉक्स, म्हणजेच ७६,८०० सिलबंद बाटल्या आढळून आल्या.

Excise officials inspect the truck after seizing fake Goa-made liquor worth ₹1.30 crore on Kolhapur highway.
SSC-HSC Board Exam: दहावी-बारावीची परीक्षा होणार कॉपीमुक्त; परीक्षा केंद्रावर असेन दक्षता समितीची नजर

एकूण मद्यसाठा १३,८२४ बल्क लिटर इतका आहे. या कारवाईत दारू साठा, ट्रक आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ३० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राजस्थानच्या ट्रक चालक रामजीवन विरधाराम बिश्नोई याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com