NH-53 वर उभ्या ट्रकला स्कूटीची जोरदार धडक
३० वर्षीय संकेत सपाटेचा जागीच मृत्यू
धारगावजवळ सकाळी घडलेला भीषण अपघात
महामार्गावरील जड वाहन पार्किंगच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
शुभम देशमुख, भंडारा
Mumbai-Kolkata National Highway 53 Bhandara Accident मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकने स्कूटीला मागून जोरदार धडक दिल्याने ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संकेत सपाटे असे मृत तरुणाचे नाव आहे.सदर अपघात आज सकाळी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत सपाटे हा पहाटेच्या सुमारास भंडारा येथून लाखनीकडे आपल्या स्कूटीने जात होता. धारगाव जवळ पोहचला असता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकने त्याच्या स्कूटीला पाठीमागून भीषण धडक दिली.या धडकेत संकेत स्कुटीवरून खाली कोसळला.
ही धडक इतकी जोरदार होती की संकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संकेतला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावर उभ्या राहणाऱ्या जड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चार दिवसांपूर्वी भरधाव येणाऱ्या कारच्या धडकेत दुचाकीवरील श्रीकांत सुधीर देशमुख (३८) व मंथन बबन देशमुख (१८, दोघेही रा. वणी) हे दूरवर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान मंथन बबनदेशमुख याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी असलेल्या कारचालकाला ताबडतोब अटक करण्यासाठी अवघे गाव मृतदेहासह तिवसा पोलिस ठाण्यात धडकले. जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घेतल्याने काही वेळासाठी ठाण्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.