रणजीत माजगाकर
गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी आराम बसचा कोल्हापूरजवळ असणाऱ्या पुई खडी या परिसरात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री अडीच वाजता अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये असणाऱ्या 25 प्रवाशांना अग्निशमन दलाने सुखरुप बाहेर काढले आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात खासगी आराम बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली. कोल्हापूर शहरातील राधानगरी रोड पुईखडी येथे ही घटना घडली. यावेळी बसमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
या बसमधील अंदाजे 25 प्रवासी यांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल कोल्हापूर महानगरपालिका यांनी केले. या अपघातात 4 प्रवासी बसच्या खाली अडकले. त्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोल्हापुरातील पुईखडी येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. नीलू गौतम(४३), रिधिमा गौतम (१७), सार्थक गौतम (१३) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी पुण्यातील रहिवाशी आहे. या अपघतातील मृत्यूने गौतम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अकोल्यातील पातूर घाटात खासगी बसचा अपघात
अकोला जिल्हातल्या पातूर जवळ पुणे येथून पातूरकडे येणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला. बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना पातूर घाटात घडली. या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. तर पुणे येथून खुराणा ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच बस ही पातूरकडे येत होती.
पातूर घाटात या खासगी बसचा वेग अनियंत्रित झाल्यामुळे ही बस उलटली. या अपघातामुळे माळराजुरा फाटा येथून काही प्रवासी पातूर येथे जाण्याकरिता बसले होते. तेथून अर्धा किमी अंतरावरच हा अपघात झाला. या बसमध्ये अन्य प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठी हानी टळली. या अपघातात चालक आणि वाहकासह चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातातील जखमींवर उपचार सुरु आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.