Kolhapur News: जालना येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूर बंद; शाळांनाही सुट्टी जाहीर

जालन्यातील लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
Kolhapur News:
Kolhapur News: Agrowon
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News In Marathi

जालन्यातील लाठीमार प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. जालन्यातील लाठीमार प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या घटनेवरून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. जालन्यातील लाठीमार प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

जालन्यातील मराठा समाजातील आंदोलकांवर शुक्रवारी लाठीमार प्रकरणानंतर राज्यातील अनेक भागात तीव्र पडसाद उमटले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाकडून अनेक जिल्ह्यात बंद देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत.

Kolhapur News:
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे कोण आहेत?

मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे उद्या कोल्हापूर शहर बंद राहणार आहे. शहर परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Kolhapur News:
Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढल्या, पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

कोल्हापुरात एसटी वाहतूक ठप्प

दरम्यान, जालना लाठीमार प्रकरणामुळे पुण्याहून जालना, संभाजीनगर, नांदेडला जाणारी बससेवा ठप्प झाली आहे. गेल्यी तीन दिवसांपासून बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षेसाठी कसं जायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या घटनेमुळे कोल्हापुरातून पुण्याकडे जाणारी एसटी वाहतूक सेवा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी पर्यायी मार्ग म्हणून खासगी वाहतूक किंवा रेल्वेचा मार्ग निवडताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com