

रणजित माजगावकर, साम टिव्ही
Kolhapur News: मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याचा नेम कोणीच लावू शकत नाही. कोल्हापूरात जनावरांना चारा देताना विजेच्या झटक्याने सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथं शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. आनंदी मोरबाळे आणि सुनीता मोरबाळे असं मृत्यू सासू सुनेचं नाव आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शामराव मोरबाळे हे जनावरांचे दूध काढण्यासाठी नेहमीप्रमाणे आई आणि आपल्या पत्नीला घेवून स्मशानभूमी जवळ असलेल्या गोठ्यात आले होते. दूध काढून ते मोटरसायकलवरून डेअरीमध्ये दूध देण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांच्या आई आणि पत्नीने जनावरांना वैरण बारीक करण्या करीता कुट्टी मशीन सुरू केलं.
मात्र काळाने डाव साधला आणि विजेचा धक्का जोरात बसल्याने त्या दोघींचा जमिनीवर कोसळून जागीच मृत्यू झाला. दरम्यान, बराच वेळ झालं आई आणि पत्नी घराकडं का आल्या नाहीत हे बघण्यासाठी शामराव मोरबाळे यांनी आपल्या वहिनीला गोठ्याकडे जाऊन पाहण्यास सांगितले. यावेळी त्यांना सासू आणि जाऊ जमिनीवर कोसळलेल्या दिसल्या.
तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलावून विद्युत प्रवाह सुरू असलेलं मशीन बंद केलं. तसेच दोघींनाही उठवण्याचा प्रयत्न केला मात्र मोरबाळे सासू सूनेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.