VIDEO: अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं? 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या

Maharashtra Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महायुती सरकारचं अंतरिम अर्थसंकल्प मांडलं आहे. यामध्ये महिलांना काय मिळालं, हे 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या....
अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं? 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या
Maharashtra Budget 2024Saam Tv
Published On

महायुती सरकारने आज आपलं अंतरिम अर्थसंकल्प मांडलं आहे. आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. यामध्ये 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्त्याची आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महायुती सरकाराच्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतूद करण्यात आली आहे, हे 10 पॉइंट्समध्ये समजून घेऊ...

महिलांसाठी विविध योजना

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी.

  • “शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये

अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं? 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या
Maharashtra Budget 2024 Highlights: अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये वाचा एका क्लिकवर
  • ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ.

  • लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ.

  • महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट.

  • ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती.

  • मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित. ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती.

अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं? 10 पॉइंट्समध्ये समजून घ्या
Maharashtra Budget 2024 Petrol Disel: महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त; राज्य सरकारची मोठी घोषणा, मुंबईसह कोणकोणत्या शहरांत दर कमी होणार?
  • महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन.

  • पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी.

  • राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com