- रणजीत माजगावकर
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी आजही (शनिवार) काम बंद आंदाेलनावर ठाम (kmt staffers on strike) राहिल्याने 42 मार्गावरील बस सेवा सलग दुस-या दिवशी ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी प्रवाशांचा खिशाला चाट बसत आहे. (Maharashtra News)
रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, महागाई भत्ता वाढवून द्यावे या मागण्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने केएमटी कर्मचारी संपावर गेले आहेत. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी शुक्रवारी संपावर जाताच महानगरपालिका प्रशासनाने एक बैठक बाेलावली. या बैठकीस केएमटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थितीत हाेते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या बैठकीत कोणताचं तोडगा न निघाल्याने आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही कर्मचा-यांनी संप सुरूच ठेवल्याचे सांगितले. केएमटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका 42 मार्गावरील बस सेवेवर झाला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.