Bandh : '76 जणांवर दंगलीचे गुन्हे, दगडफेकीस पाेलीस जबाबदार भाजप आमदारांचा आराेप'; खामगावात कडकडीत बंद

कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चाैका चाैकात पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला आहे.
khamgaon
khamgaonsaam tv
Published On

Khamgaon Bandh : पाेलिसांनी (police) दंगलीचा गुन्हा नाेंदविल्याने आज (साेमवार) खामगावात (khamgaon) नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे. या बंदमुळं शहरातील बाजारपेठेसह छाेटे माेठी दुकानांना टाळा आहे. कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी शहरातील चाैका चाैकात पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला आहे.

पोळ्याच्या (bail pola) दिवशी खामगावात शुल्लक कारणावरून ऐन गर्दीच्या वेळेस दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. या प्रकरणात खामगाव पोलिसांनी 76 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या भूमिके विरोधात भाजपा आमदार आकाश फुंडकर (mla akash fundkar) नाराजी व्यक्त करीत खामगाव शहर बंद करण्याचं आवाहन केलं हाेते.

khamgaon
Satara : साताऱ्यात पालिका इमारतीचा पाया खोदताना मिळाला ब्रिटीशकालीन साठा; रायफलींच्या गोळ्या, दस्ता, मॅगझीन (पाहा व्हिडीओ)

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळपासुन् खामगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच खामगाव शहरातील तीन पोलीस अधिका-यांना गणेश उत्सवावेळी (Ganesh Utsav 2022) बाहेर जिल्ह्यात पाठवावे अशी मागणी आमदार फुंडकर यांनी केली आहे. तसेच पोळ्याच्या दिवशी जी दगडफेक झाली त्याला जबाबदार हे पोलीस अधिकारीच असल्याचा गंभीर आरोप चक्क आमदार फुंडकरांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

khamgaon
Snake Bite : साप चावल्याने बारावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; कापरे कुटुंबावर शाेककळा
khamgaon
विधानभवना बाहेर राडा ! 'सामान्य जनता काॅलर पकडून तुम्हांला रस्त्यावर मारेल, लक्षात ठेवा'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com