Sangli News: अन्यथा कवठे महांकाळ बंद करु... क्रीडांगणाचा ताबा घेणाऱ्या तहसीलदारांना खेळाडूंचा इशारा..

Kavathe Mahankal News: सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये खेळाडू विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Kavathe Mahankal News
Kavathe Mahankal Newssaam tv news
Published On

Kavathe Mahankal News:

मैदानांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. खुल्या मैदांनावर बिल्डर्स उंच उंच इमारती बांधत आहेत. त्यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानं शिल्लक राहिलेली नाहीत. अशातच मैदानावरुन सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये खेळाडू विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

सांगलीच्या कवठे महांकाळमधील तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर तहसीलदारांकडून मज्जाव करण्यात आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून तहसील कार्यालयासमोरील क्रीडांगणावर खेळाडूंचा व्हॉलीबॉल सराव सुरू होता.

मात्र कवठे महांकाळ तहसीलदारांकडून क्रीडांगणावरील खेळास बंदी घालण्यात आली आहे.मात्र क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी याचा तीव्र विरोध केला आहे.याच क्रीडांगणावरून राज्य आणि देशपातळीवर चमकणारे खेळाडू निर्माण झाले आहेत. (Latest marathi news)

Kavathe Mahankal News
IND vs ENG 3rd Test: सरफराजचं पदार्पण होणार! या युवा खेळाडूलाही मिळणार प्लेइंग ११ मध्ये स्थान

राज्य सरकारकडून तालुक्यात क्रीडांगण उभारण्याबाबत घोषणा केल्या जात आहेत.मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून मात्र खेळांवर बंदी आणण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा,अन्यथा शहर बंद करून धडक मोर्चा काढण्यात येईल,असा इशारा क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी यावेळी दिला आहे.

Kavathe Mahankal News
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

तर यावेळी कवठे महांकाळ तहसीलदार अर्चना कापसे याना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,या परिसरात अवैध प्रकार घडत आहेत. त्यामुळे याठिकाणचे क्रीडांगण बंद करण्यात आले आहे. मात्र माध्यमांसमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून क्रीडांगण दुसरीकडे हलवण्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com