Karuna Sharma : धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मला धमकीचा फोन केला. माझ्यावर काेणताही वाईट प्रसंग उदभवल्यास त्यास धनंजय मुंडे (dhananjay munde) जबाबदार असतील असे करुणा शर्मा (karuna sharma) यांनी आज (साेमवार) झालेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले.
करुणा शर्मा यांनी त्यांना धमकीचा फाेन आल्याबाबतची तक्रार बीड (beed) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नाेंदवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या एका निकटवर्तीय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शर्मा यांनी केली आहे. (Maharashtra News)
आष्टी येथे झालेल्या एका कार्यक्रमातून करुणा शर्मा बीडकडे निघाल्या होत्या. त्याच दरम्यान धनंजय मुंडे यांच्या एका कार्यकर्त्याने "तू राजकारण सोडून दे" असं म्हणत करुणा शर्मा यांना अर्वाच्य भाषेत आणि गलिच्छ शिव्या दिल्याचे नमूद केले. दरम्यान याच पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
करुणा शर्मा यांना आपबीती सांगताना अश्रू आनावर झाले. भविष्यात माझ्यावर कोणताही हल्ला झाला तर सर्वस्वी धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असतील असं त्यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. त्या म्हणाले छाेट्या छाेट्या कार्यकर्त्यांना नाही तर मुंडे आणि त्यांच्या बगलबच्च्यांवर कारवाई झाली पाहिजे. कार्यकर्त्यांना कशाला पाठवताय स्वत: लढ की ग दाखविते इंगा असा इशारा देखील शर्मा यांनी मुंडेंना दिला आहे. (Karuna Sharma Latest Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.