Karnataka Bagalkot News: बागलकोटमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, शिवप्रेमींमध्ये संताप

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Romoved: कर्नाटक सरकारने अर्ध्या रात्रीत कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हा पुतळा हटवला. या प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Romoved
Chhatrapati Shivaji Maharaj Statue RomovedSaamtv
Published On: 

Karnataka Bagalkot News: कर्नाटक सरकारच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या बागलकोट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने स्थानिकांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Romoved
Aditya Thackeray: मुख्यमंत्री डरपोक, अटकेच्या भीतीने भाजपमध्ये उडी मारली; आदित्य ठाकरेंचा वर्मी घाव

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकमधील बागलकोट चौकात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा कर्नाटक सरकारकडून रातोरात हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटक सरकारने अर्ध्या रात्रीत कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हा पुतळा हटवला.

या प्रकाराने स्थानिक शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीही याबद्दल आक्रमक भूमिका घेत 'शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने बसवा अन्यथा कॉंग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही...' असा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Romoved
Aditya Thackeray: मुख्यमंत्री डरपोक, अटकेच्या भीतीने भाजपमध्ये उडी मारली; आदित्य ठाकरेंचा वर्मी घाव

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या कारवाईचा निषेध केला आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री हटवला आहे. हा संपूर्ण हिंदुस्थान आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची ही मुजोरी आम्ही सहन करणार नाही.. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

"महापुरुषांचा सातत्यानं अपमान करणं हे काँग्रेसचं धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा अन्यथा काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.. असा इशाराही त्यांनी दिला आहे. Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.