Kalyan News : नामांकित कंपनीच्या नावाने बनावटी तूप विक्री; कल्याणमध्ये महिलेला ताब्यात घेत ७० किलो तूप जप्त

Kalyan News : कल्याणच्या दुर्गाडी परिसरात एक महिला तूप विक्री करत होती. हे तूप बनावटी असल्याचा संशय आहे
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख

कल्याण : सणासुदीचे दिवस असल्याने तुपाची मागणी वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात तुपाची विक्री होते. याचा फायदा घेत नकली तूप नामांकित ब्रँडच्या नावाखाली विकण्याच्या अनेक घटना उघड होतात. कल्याणमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. यात एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. 

कल्याणच्या (Kalyan) दुर्गाडी परिसरात एक महिला तूप विक्री करत होती. हे तूप बनावटी असल्याचा संशय आहे. सदर महिलेस केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देत काही सांगण्यास तयारी दर्शविली नाही. विशेष म्हणजे तूपाच्या पॅकेटवर नामांकित कंपनीचे नाव आहे. यामुळे सदर महिलेला केडीएमसी (KDMC) अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. 

Kalyan News
KDMC News : पाणी टंचाईने त्रस्त महिलांनी काढला मडके मोर्चा; मडके फोडत केडीएमसीचा केला निषेध 

कल्याणच्या दुर्गाडी किल्ले परिसरात केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ७० किलो बनावटी तूप असल्याचा संशयावर एका महिलेला या तुपासह ताब्यात घेेतले आहे. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनास आणि पोलिसांना दिली असून पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाने तुपाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com