KDMC News : पाणी टंचाईने त्रस्त महिलांनी काढला मडके मोर्चा; मडके फोडत केडीएमसीचा केला निषेध 

Kalyan News : कल्याणमधील बेतूरकर पाडा, चिकणघर, काळा तलाव, उंबर्डे, सापड, कोळवली इत्यादी भागांतील नागरिकांना पाणीटंचाई आणि दूषित पाण्याचा पुरवठा सहन करावा लागत आहे
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याणमधील काही भागांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही केडीएमसीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज शेकडो महिलांनी केडीएमसी मुख्यालयावर मडकं मोर्चा काढला. यावेळी महिलांनी मडके फोडून केडीएमसीच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.

कल्याणमधील (Kalyan) बेतूरकर पाडा, चिकणघर, काळा तलाव, उंबर्डे, सापड, कोळवली इत्यादी भागांतील नागरिकांना पाणीटंचाई आणि दूषित पाण्याचा पुरवठा सहन करावा लागत आहे. पाणी समस्येबाबत नागरिकांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र आश्वासना पलीकडे काहीच कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. केडीएमसीच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणी टंचाई आणि दूषित पाण्याचा सामना करावा लागतो; असा आरोप करत शेकडो संतप्त महिलांनी (KDMC) केडीएमसी मुख्यालयावर मडकं मोर्चा काढला. 

KDMC News
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील २२६ पैकी ८१ प्रकल्प ओव्हरफ्लो; दमदार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला

मडके फोडून केला निषेध 

केडीएमसीच्या मुख्यालयावर मोर्चा आणत महिलांनी घोषणाबाजी करत मडके फोडून निषेध नोंदवला. यावेळी बोलताना महिलांनी पाणी बिले वसूल केली जातात; मात्र पाणी दिले जात नाहीत. पाणी बिले उशिराने भरली तर थकीत बिलांवर व्याज लावले जाते. आम्हाला महिनोंमहिने पाणी मिळत नाही, असे चालणार नाही. वारंवार तक्रारी केल्या, पण काहीच उपयोग होत नाही, म्हणूनच आज आम्ही मडकं फोडून निषेध नोंदवल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com