Dharashiv News
Dharashiv NewsSaam tv

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील २२६ पैकी ८१ प्रकल्प ओव्हरफ्लो; दमदार पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला

Dharashiv News : यंदा राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे सर्व नदी, नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे
Published on

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांपैकी लहान मोठे ८१ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तर २८ प्रकल्प ८० टक्के भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पाण्याची समस्या जवळपास मिटली आहे. शिवाय सिंचनाचा प्रश्न देखील मिटला आहे. 

यंदा राज्यातील सर्वच भागात जोरदार (Rain) पाऊस झाला आहे. या पावसामुळे सर्व नदी, नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. यामुळे मागील वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळ यंदा जाणवणार नसल्याचे चित्र सद्यस्थितीच्या परिस्थितीवरून पाहण्यास मिळत आहे. दरम्यान धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील एकूण प्रकल्पांपैकी ८१ प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ८०  हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.

Dharashiv News
Accident News : जिवलग मित्रांवर काळाचा घाला, बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

दरम्यान सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील प्रकल्पात ४६४.९५५ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह खेडेगावांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अधिक असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याची सध्या तरी शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com