Kalyan BJP Banner : भाजपच्या बॅनरवर मनसे आमदारांचा फोटो; सोशल मीडियावर बॅनर व्हायरल

Kalyan News भाजपच्या बॅनरवर मनसे आमदारांचा फोटो; सोशल मीडियावर बॅनर व्हायरल
Kalyan BJP Banner
Kalyan BJP BannerSaam tv
Published On

अभिजित देशमुख 

कल्याण : सिन्नर येथे टोलनाक्याची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या घटनेनंतर भाजपने मनसेवर टीका केली. टोलनाक्याच्या तोडफोडीच्या घटनेनंतर भाजप आणि मनसेमध्ये (MNS) आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. तर दुसरीकडे (Kalyan) कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो भाजपच्या एका बॅनरवर असल्याचा फोटो सोशल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजपच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Breaking Marathi News)

Kalyan BJP Banner
Washim MNS News : गुंठेवारीच्या प्रकरणावर कार्यवाहीसाठी मनसेचे बॅन्ड बजाओ

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. १४ गावांसाठी निधी मिळवा; यासाठी मनसे आमदार राजू पाटील आणि सर्व पक्षीय विकास समितीने पाठपुरावा केला होता. १४ गावांसाठी भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी दिला आहे. त्यामुळे मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी हा बॅनर बनवण्यात आला आहे.

Kalyan BJP Banner
Parbhani Soldier Accident : जवान लक्ष्मण तांदळे यांना वीरमरण; कर्तव्य बजावत असताना झाला अपघात

सोशल मीडियावर व्हायरल 

बॅनरवर कल्याण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, चिटणीस गुरुनाथ पाटील (BJP) यांच्या मागणीने आणि आमदार राजुशेठ पाटील (Raju Patil) यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभामार्फत चौदागावातील रस्त्यांना ३२ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल रविंद्र चव्हाण (मंत्री - सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र) यांचे जाहीर आभार..! असा मजकूर लिहण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बॅनरचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com