Parbhani Soldier Accident : जवान लक्ष्मण तांदळे यांना वीरमरण; कर्तव्य बजावत असताना झाला अपघात

Parbhani News जवान लक्ष्मण तांदळे यांना वीरमरण; कर्तव्य बजावत असताना झाला अपघात
Soldier Death
Soldier DeathSaam tv

परभणी : भारतीय सैन्य दलात असलेले परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमधील (Parbhani) लक्ष्मण रामराव तांदळे (वय ३२) यांना वीरमरण आले आहे. कर्तव्यावर असतांना त्यांचा अपघात (Accident) झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Maharashtra News)

Soldier Death
Bogus Soybean Seeds : सोयाबीनचे बोगस बियाणे; जिल्ह्यात ७८ तक्रारी, शेतकरी मेटकुटीला

परभणी जिल्ह्यातील तांदळवाडी येथील रहिवाशी असलेले लक्ष्मण तांदुळे हे भरतील सैन्य दलात कार्यरत होते. जयपूरमध्ये कर्तव्यावर असतांना अपघातात सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. जवान तांदळे कर्तव्य बजावताना रविवारी रात्री त्यांचा रस्ता अपघात झाला होता. त्यांना जयपूर रुग्णालयात दाखल केले. परंतु, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 

Soldier Death
Washim MNS News : गुंठेवारीच्या प्रकरणावर कार्यवाहीसाठी मनसेचे बॅन्ड बजाओ

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

लक्ष्मण तांदूळे यांचे पार्थिव पार्थिवावर तांदळवाडीत या त्यांच्या गावी आणले. यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Soldier Death) करण्यात आले, ह्या वेळी मोठ्या संखेने नागरिकांची उपस्थिती होती. लक्ष्मण यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, चार बहिणी असा मोठा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com