Washim MNS News : गुंठेवारीच्या प्रकरणावर कार्यवाहीसाठी मनसेचे बॅन्ड बजाओ

Washim news गुंठेवारीच्या प्रकरणावर कार्यवाहीसाठी मनसेचे बॅन्ड बजाओ
Washim MNS News
Washim MNS NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिम शहरातील प्रलंबित असलेली गुंठेवारी व भूखंड नियमित करणेबाबत ३ जून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यत स्विकारलेल्या (Washim) प्रकरणावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) वाशिम नगरपरिषद कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात बॅन्ड बजाओ आंदोलन केले आहे. (Tajya Batmya)

Washim MNS News
Vasai Crime News : कब्रस्तानात जाऊन चोरट्यांनी चोरले २६ नळ

गुंठेवारीच्या प्रकरणावर कार्यवाहीसाठी मनसेच्यावतीने अनेकवेळा निवेदने देवून कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. वाशिम नगर परिषदेने ३ जून ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत शहरातील नागरीकांकडून प्रत्येकी ५०० रुपये फी आकारुन ३०८७ प्रकरणांची नोंद केली आहे. मात्र गुंठेवारीची कार्यवाही धिम्या गतीने सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार यातील १६५८ प्रकरणे भूमि अभिलेख कार्यालयाकडे पाठविण्यात आली असून ८३ प्रकरणाची मोजणी झाली आहे. तसेच १५७५ प्रकरणे प्रलंबित आहेत. 

Washim MNS News
Bogus Soybean Seeds : सोयाबीनचे बोगस बियाणे; जिल्ह्यात ७८ तक्रारी, शेतकरी मेटकुटीला

१४२५ प्रकरणे प्रलंबित 

गेल्या तीन वर्षात ही प्रकरणे निकाली निघण्याची टक्केवारी केवळ २.७ टक्के आहे. तसेच १४२५ प्रकरणे नगर परिषदेत धुळखात पडून आहेत. सदर गुंठेवारीची प्रकरणे त्वरीत मार्गी लावून नागरीकांना दिलासा द्यावा; या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com